अकोला : स्थानिक उमेदवारांकडून जास्त अपेक्षा नाहीत; पण केंद्रात मजबूत सत्ता हवी, त्यासाठीच मतदान करणार, निवडणू कोणी आले तरी विकास होणारा तो होतोच अशा बोलक्या प्रतिक्रीया ऐकत रेल्वे स्टेशन - खडकी या शहर बस मधून प्रवास सुरू झाला या मध्यवर्ती बस स्थानक येथून खडकीसाठी निघालेल्या बसमध्ये प्रवाशांसोबत चर्चा घडवून आणली. यावेळी एका वयोवृद्ध महिलेने, मतदानाचा हक्क बजावणार; पण अपेक्षांचं काय घेऊन बसता, त्या काही पूर्ण होत नसल्याचे म्हटले. त्या महिलेच्या एका वक्तव्याने मतदारांच्या अपेक्षांचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदारांनी रोजगार निर्मितीवर उमेदवाराने भर द्यायला हवा. सद्यस्थितीत जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने रोजगार मिळत नाही. शिक्षण घेऊनही मुलांना नोकरीसाठी पुण्या-मुंबईत जावे लागत असल्याचे शैला पांडे या महिलेने म्हटले. खडकीपासून बसचा परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी स्थानिक अपेक्षांचं सोडा, केंद्रात मजबूत सरकार हवे, हीच अपेक्षा असल्याचे मत गगन गावंडे या प्रवाशाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. या प्रवासात काही तरुण मतदारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यातील काहींसाठी ही पहिलीच निवडणूक असल्याचे निदर्शनास आले. उमेदवाराला मत देताना त्याने जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे म्हटले.बँकेच्या कर्जमाफीचं काय?खडकीपर्यंतच्या या शहर बस प्रवासात एका शेतकऱ्याशी गाठ पडली. निवडणुकीवर चर्चा चांगलीच रंगात आली होती. तेवढ्यात मतदार काय एका दिवसाचा राजा अन् पाच वर्षांचा गुलाम. उमेदवाराचं साधं तोंडही दिसत नसल्याची प्रतिक्रिया त्या शेतकऱ्याने व्यक्त केली. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, शेतकरी कर्ज माफ झाल्याचे सांगते; पण बँकेत गेल्यावर कर्ज फेडावेच लागणार असल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली जाते, पण प्रत्यक्षात शेतकºयांना मिळत नसल्याची खंत यावेळी एका मतदाराने व्यक्त केली.