अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर चाचण्यांसाठी अकोल्यासह परिसरातील जिल्ह्यांना नागपूर येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत होते. १२ एप्रिल २०२० रोजी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हीआरडीएल लॅब सुरू झाला. या १३ महिन्यांच्या कालावधीत कमी मनुष्यबळातही अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबने ३ लाख ३ हजार ५८९ चाचण्यांचा टप्पा गाठला. अकोल्यासह शेजारील जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रत्येकाच्याच मनात भीतीचे वातावरण होते. परिसरातील संदिग्ध रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात येत. विदर्भातील एकमेव प्रयोगशाळा असल्याने अहवाल मिळण्यास आठ दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत हाेता. याच दरम्यान अकोल्यातील प्रस्तावित व्हीआरडीएल लॅब १२ एप्रिल रोजी सुरू झाल्याने पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांसाठी मोठा आधार ठरली. अत्यल्प मनुष्यबळावर व्हीआरडीएल लॅब सुरू झाली. त्यात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांसह काही दिवस यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातीलही रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढू लागल्याने प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांवरील ताण वाढू लागला. मध्यंतरी काही तांत्रिक अडचणी आणि सदोष कोविड कीटमुळे काही समस्यांचा सामना कारावा लागला, मात्र निरंतर कार्यरत राहून कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत ३ लाखांवर चाचण्यांचा टप्पा गाठला. यातील सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त चाचण्यात मागील सहा महिन्यात करण्यात आल्या आहेत.
अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ने गाठला तीन लाख चाचण्यांचा टप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 5:20 PM
VRDL reaches 3 lakh test stage : अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबने ३ लाख ३ हजार ५८९ चाचण्यांचा टप्पा गाठला.
ठळक मुद्देदुसऱ्या लाटेतच सर्वाधिक दोन लाख चाचण्याकमी मनुष्यबळात केले रात्रंदिवस काम