वाडेगाव ग्रामपंचायतकडून शुक्रवारी दोन बोअरवेल करण्यात आल्या. दोन्ही बोअरवेलला मुबलक पाणी लागले असून, आता ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतने लक्ष घालून वाॅर्ड क्र.४ मधील खैवाडी आणि वाॅर्ड क्र. ५ मधील देगाव टी पॉईंट येथे दोन बोअरवेल केल्या. त्या दोन्ही बोअरला मुबलक प्रमाणात पाणी लागले असून पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बोअरवेल करण्यासाठी सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य मो. सलीम जमदार, अय्याज साहील, मो. मुजाहिद, हनिफ भाई, राजू पळसकार, डॉ. शे. चाँद, मोहम्मद अफतर उर्फ बब्बू ठेकेदार, ॲड. सुबोध डोंगरे, डॉ. सोहेल खान, असलम भाई, अंकुश शहाणे, सतीश सरप, शे. मोईन शे. खाजा, सदानंद मानकर, गजानन मानकर, सुनील मानकर, इरफान कुरेशी, शकीलभाई आदींनी पुढाकार घेतला.
फोटो: मेल फोटोत