बाळापूर तालुक्यातील आठ गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. यामध्ये वाडेगावाचा समावेश असून, गाव सील करण्यात आले आहे. गावात फिरून दुकानदार बंद करण्याचे सांगण्यात येत आहे, तसेच कोरोना संदर्भात ‘नियम पाळा, मास्क वापरा’, ‘स्वच्छ हात धुवा’ आदींबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. रविवारी सरपंच मेजर मंगेश तायडे, सुनील मानकर, राजकुमार अवचार, शेख मोईन शेख ख्वाजा, शेख चांद, अंकुश शहाणे, प्रकाश मसने, मोहम्मद हनिफ भाई, सचिन धनोकार, राजेश्वर पळसकर, ॲड.सुबोध डोंगरे, मोहम्मद मुजाहिद, अय्याज साहिल, शेख सलीम भाई, प्रशांत मानकर, मोहम्मद अफतर उर्फ बब्बूभाई, सदानंद मानकर, मोहनसिंग लोध, तलाठी एस. ताथोड, इंगळे, कोतवाल नारायण मानकर, नारायण घटोळ, ग्रामसचिव गजानन डिवरे, सदानंद मानकर, बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद घुईकर आदी उपस्थित होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाडेगाव ‘सील’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:19 AM