-------------------------------
माझोड येथे ८० टक्के मतदान
माझोड : येथे ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के मतदान झाले. येथील प्रभाग क्र.१ मध्ये एकूण ७१२ मतदार होते. त्यापैकी २५९ महिलांनी तर ३१२ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५७१ मतदारांनी मतदान केले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
-------------------------
दिग्रस बु -दिग्रस खु. निर्मानधीन रस्त्याचे निकृष्ट
दिग्रस बु: पातूर तालुक्यातील दिग्रस बु-दिग्रस खुर्द या निर्माणधीन मुख्य रस्त्याचे निकृष्ट होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. रस्त्यावरील टाकलेली मोठी खडी उखडून निघत आहे. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
-------------------------------
पणज परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस
पणज : आकोट तालुक्यातील ग्राम पणज परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी त्रस्त झाले आहेत तसेच वन्यप्राणी हल्ला करत असल्याने शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कही दिवसांपूर्वी शेतकरी संजय आवंडकार, शेतमजूर अशोक काळबाग शेतात गेले असता रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला होता.
-------------------------------
अकोटात राष्ट्रीय युवक दिन साजरा
अकोट: शहरातील व्यक्तिमत्त्व विकास संघटना जेसीआयतर्फे आस्की किड्स येथे राष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्याधर कोठीकर, नितीन झाडे, प्रा. नेहा झाडे आदी उपस्थित होते.
--------------------------------
मन नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक सुरूच
लोहारा : बाळापूर तालुक्यातील लोहारा परिसरातील मन नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. जड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.