अकोला : राज्य शासनाच्या पणन महासंघाकडून हमी दराने कापूस खरेदीला अद्यापही सुरुवात झालेली नाही. शासनामार्फत कापसाला प्रतिक्विंटल ४ हजार ३६0 रूपये एवढा हमी भाव जाहीर केला आहे. खासगी कापूस खरेदीत व्यापार्यांकडून सद्य:स्थितीत शे तकर्यांना प्रतिक्विंटल ३ हजार ४00 ते चार हजार रुपये असा भाव दिला जात आहे. त्यामुळे पणन महासंघामार्फत कापूस खरेदी केव्हा सुरु होणार, याबाबत जिल्ह्यातील कापूस उत् पादक शेतकर्यांना प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यात सोयाबीन व कापूस ही दोनच प्रमुख नगदी पिके असून, यावर्षी या दोन िपकांवरच शेतकर्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. सुरूवातीला पावसाने मारलेली दडी व पर तीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे या दोन्ही पिकांना फटका बसला आहे. का पसाचे सरासरी एकरी उत्पादन घटले असून, उत्पादनाचा खर्चही भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे. हमी दराने कापूस खरेदीचा मुहूर्त अद्याप निघाला नसल्याच्या स्थितीत सध्या सुरू असलेल्या खासगी कापूस खरेदीत व्यापार्यांकडून प्रतिक्विंटल ३९00 रुपये ते चार हजार रूपयापर्यंत कापसाला भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने पणन महासंघामार्फत कापूस खरेदी सुरू ेकेल्यास बाजारपेठेत खासगी कापूस खरेदीत कापसाचे भाव वाढतात. त्यानुषंगाने पणन महासंघामार्फत हमी दराने कापूस खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. आकोट, तेल्हारा व हिवरखेड भागात खासगी पद्धतीने व्यापार्यांमार्फत का पूस खरेदी केली जात आहे. मात्र, खासगी कापूस खरेदीत कापसाला कमी भाव मिळत असल्याने, शासनामार्फत पणन महासंघाकडून हमी भावाने कापूस खरेदी सुरू होण्याची प्र तीक्षा परिसरातील शेतकर्यांना आहे.
हमी भावात कापूस खरेदीची प्रतीक्षा!
By admin | Published: November 07, 2014 1:00 AM