विकलेल्या तुरीचे चुकारे थकलेतेल्हारा : येथील मार्केट यार्डमध्ये १० जानेवारीपासून नाफेडने तूर खरेदी सुरू केली तेव्हापासून २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. गेल्या एक महिन्यापासून मोजमाप झालेल्या तुरीचे चुकारेच शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे चित्र आहे. मार्केट यार्डमध्ये अजूनही १६ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यातील १३०० शेतकऱ्यांनी तूर नाफेडला दिली. त्यापैकी ९०० शेतकऱ्यांना ९ कोटी २० लाख रुपयांचे वाटपही आले; मात्र ४०० शेतकऱ्यांनी तूर देऊन १ महिना झाला, तरीही तुरीची रक्कम मिळाली नाही. तीन कोटी रुपयांचा वाटप अद्याप झालेला नाही. तूर मोजणी झाल्यानंतर २४ तासांच्या आत शेतकऱ्यांना पैसा मिळणे अपेक्षित आहे; मात्र एक महिना उलटूनही शेतकऱ्यांना पैसा मिळाला नाही. केंद्र शासनाने तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना अद्यापही पैसा भेटला नाही, तर अजूनही १६ हजार क्विंटल तूर मार्केट यार्डमध्ये पडून असून, केवळ एक हजार क्विंटलला पुरेल इतका बारदाना सध्या उपलब्ध आहे. २२ मार्च रोजी नाफेडला तूर मोजणी करून दिली; मात्र नाफेडने अजूनही पैसा न दिल्याने घरचे व्यवहार ठप्प झाले आहेत, त्यामुळे कोणतेही काम होत नाही.- चंद्रकांत गायकवाड, शेतकरी ७५ टक्के शेतकऱ्यांना रक्कम वाटप झालेली आहे. उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना १-२ दिवसांत वाटप करण्यात येईल. - मनोज वाजपेयी, डीएमओ, अकोला.
१६ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: April 17, 2017 2:05 AM