- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या पाच वर्षात जवळपास तीन वर्षे अवर्षणाचा सामना करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील अर्थकारणाची मदरा आता मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे.जिल्ह्याचे एकंदरीत अर्थकारण हे २४ हजार कोटींच्या घरात गेलेले आहे. यंदा मान्सून चांगला व वेळेत बरसला तर कृषी क्षेत्रासोबतच त्याच्याशी पुरक व्यवसायांना सुगीचे दिवस येणार आहे. मात्र अलीकडील काळात जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी स्थिती येत असल्याने जिल्ह्याचे अर्थकारणही काहीसे डबघाईस आले आहे.सध्या पाऊस नसल्याने कृषी क्षेत्रातही अपेक्षीत अशी उलाढाल होत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी शेती मशागत करून ठेवली आहे. मात्र गेल्या दहा वर्षात ग्लोबल वार्मिंगमुळे पावसाच्या प्रमाणात झालेल्या चढ उतारामुळे शेतकरी वर्गही आता धोका स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसूस दमदार पावसाच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहे.दरम्यान, पीक कर्ज वाटपाचो प्रमाणही जिल्ह्यात तुलनेने कमी आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हातात सध्या अपेक्षीत असा पैसा नाही. शेतकरी सन्मान निधीचीही शेतकºयांना प्रतीक्षा आहे. बुलडाणा जिल्ह्याचे अर्थकारण हे ९५ टक्के कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनवरच बुलडाणा जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा तुलनेने कमी आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक १६ टक्के तर सर्वात कमी सिंचन हे शेगाव तालुक्यात आहे. त्यातच अवर्षणाच्या स्थितीमुळे यंदा शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. परिणामी जिल्ह्यातील अन्य व्यवसायांनाही आपसूकच त्याचा फटका बसला आहे.आधीच पाण्याची उपलब्धता नसल्याने औद्योगिक क्षेत्रातही समस्यांचे वारे घोंगाऊ लागले आहे. १६ टीएमसी पेक्षा अधिक अर्धात ५३३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या बुलाडणा जिल्ह्यातील ९१ धरणामध्ये आजच्या घडीला अवघा तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काळात पाऊस अपेक्षेप्रमाणे न पडल्यास टंचाईचे सावट गडद होऊन त्याचे विपरीत परिणाम बुलडाणा जिल्ह्याच्या अर्थकारणावर पडण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.दुष्काळी स्थिती पाहता यंदा बाजार समित्यांमध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक रुपयांच्या शेती मालाची आवक घटली आहे. दुष्काळी स्थितीमुळे लोणार, मेहकर तालुक्यास मराठवाड्याच्या सीमावर्ती भागाला लागून असलेय तालुक्यातून महापालिका, औद्योगिक शहरांमध्ये काहींनी स्थलांतर केले आहे. वेळ पाऊस न आल्यास पाण्याच्या टंचाईचा परिणाम जिल्ह्यातील अस्थायी व्यावसायिक, विक्रेते यांच्या दैनंदिन उलाढालीवर होणार आहे. बर्फ कारखाने, उपहारगृहांमधील उलाढाल प्रसंगी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सून येत्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दाखल होण्याचे संकेत कृषी विभागातील तज्ज्ञ सुत्र देत आहेत. गेल्यावेळीही मान्सून काहीसा उशिरा आला होता. मात्र नंतर त्याने काही काळ जोर पकडला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात साधारणत: १५ ते २५ जून दरम्यान पाऊस दाखल होण्याचा ट्रेन्ड आहे. गेल्या वर्षी २५ जून ते चार जुलै या कालावधीत पाऊस बरसल्याने शेतकºयांनी पेरण्या केल्या होत्या. हवामान खात्यातील सुत्रांचा अंदाजही येत्या काळात मान्सून सक्रीय होईल असा आहे. गेल्या वर्षीही जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला होता. तो काहीसा उशिरा जरी पडला तरी त्यावेळी पेरणी होऊ शकले.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.मान्सूनवर सध्या मदार आहे हे बरोबर आहे. मात्र आता वेळ निघून गेली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अकारण पॅनिक केल्या सारखे ते होईल. येत्या काळात पाऊस पडले, हवामान विभाग त्यावर नजर ठेऊन आहे. त्यामुळे एकदम अर्थकारणास फटका बसले असे आताच म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही. पाऊस आल्यास जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पेरण्या होऊ शकतात. पीकही चांगले येऊ शकेल.- सी. पी. जायभाये,शास्त्रज्ञ पीकेव्ही, शाखा बुलडाणा
अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 3:55 PM