विकासकामे करण्याची मुदत संपली !
महापालिकेला दाेन्ही याेजनांसाठी मंजूर झालेल्या निधीतील विकासकामे मार्च महिन्यात पूर्ण करणे भाग हाेते. जिल्हाधिकाऱ्यांनी निधी वितरणाला मंजुरी दिल्यानंतर मनपाने निविदा प्रक्रिया राबवली. परंतु विकासकामांना मार्च महिन्यापूर्वी प्रत्यक्षात सुरूवात करून त्यावर दहा काेटी ८४ लाख रुपये खर्च करणे अपेक्षित हाेते. निधी खर्च न झाल्यामुळे ताे शासनाकडे परत करावा लागणार हाेता. वर्तमान स्थिती पाहता विकासकामे करण्याची मुदत संपली असल्याने कायदेशीर पेच निर्माण हाेण्याचे संकेत आहेत.
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च महिन्यापर्यंत खर्च करणे भाग हाेते. तसे न झाल्यामुळे मनपाने कंत्राटदारांना कार्यादेश दिल्यास कायदेशीर पेच निर्माण हाेण्याची दाट शक्यता आहे. देयके वेळेवर प्राप्त हाेत नसल्यामुळे बांधकाम विभागातील कंत्राटदारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी यासंदर्भात ठाेस निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.