लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा (अकोला): रब्बी हंगामामध्ये दरवर्षी वान धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळते; परंतु यावर्षी जिल्ह्यातील अन्य धरणांची पाण्याची स्थिती बिकट आहे. वान वगळता एकही धरण भरले नाही. संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी वान धरणातील पाणी आरक्षित केले होते व केवळ एका कालव्याद्वारे एक पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळे, शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी रब्बीसाठी पाणी मिळावे, ही आग्रही भूमिका घेतली. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. तालुक्यातील वान धरण ‘हनुमान सागर’ म्हणून ओळखले जाते. संकटमोचन असलेले हनुमान सागर शेतकर्यांवरील संकट दूर करण्यासाठी दरवर्षी धावून येत होते. हनुमान सागरमधील पाण्यावर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील हजारो हे क्टरवर रब्बी पीक घेतल्या जात होते. यावर्षी तालुक्यासह जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील वान धरण वगळता उर्वरित धरणामध्ये जलसाठा अल्प प्रमाणात आहे. परिणामी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून जिल्हा प्रशासनाने वान धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. रब्बी हंगामासाठी केवळ एका कॅनॉलमधून फक्त एक पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या निर्णयामुळे ज्या कॅनॉलद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्या जाणार होते, त्यालगत असलेल्या शेतमालकांची संभ्रमावस्था होती. कारण केवळ एका पाण्यावर हरभर्याचे पीक येऊ शकत नाही. तसेच ज्यांच्या शेतालगत असलेल्या कालव्याद्वारे पाणी योणारच नव्हते त्यांची अवस्था मोठी गंभीर झाली हो ती. ज्यांच्या जमिनी या धरणाच्या पाण्यावर सिंचन करण्याकरिता कालवे खोदण्यात गेली, त्यांच्यावर हा निर्णय अन्यायकारक होता. तेल्हारा तालुक्यातील शेतकर्यांवर अस्मानी संकट आल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि कापूस यापैकी कोणतेच पीक हाती आले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. किमान रब्बी पिकासाठी वान धरणातून पाणी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शे तकरी होते.
रब्बी सिंचनासाठी वान धरणाचे पाणी दोन वेळा मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:24 AM
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे.
ठळक मुद्देअखेर सिंचनाचा तिढा सुटलाआ. भारसाकळेंच्या प्रयत्नांना यश