अकोला, दि. 0७- महापालिका निवडणुकीच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. आरक्षणामुळे दिग्गजांच्या प्रभागांमध्ये बदल झाल्याने राजकीय समीकरणात उलथापालथ झाली आहे.प्रभागनिहाय आरक्षणात महिलांना मिळालेले स्थान लक्षात घेता, यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांचा बोलबोला राहणार आहे. मनपाच्या हद्दवाढीनंतर प्रभाग पुनर्रचनेनुसार २0 प्रभाग अस्तित्वात आले असून, त्यामधून प्रत्येकी चार यानुसार ८0 नगरसेवक निवडून येतील. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी १४, अनुसूचित जमातीसाठी २, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग २२ आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी ४२, अशा एकूण ८0 सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ८0 सदस्यांमध्ये ५0 टक्के आरक्षणानुसार महिला सदस्यांसाठी ४0 जागा राखीव आहेत. आरक्षणाची सोडत काढताना प्रत्येक जातीनिहाय प्रवर्गात महिलांना समान आरक्षण देण्यात आले.
प्रभाग आरक्षणामुळे झाली उलथापालथ!
By admin | Published: October 08, 2016 3:16 AM