भाजपच्या गाेटात उत्साह
राज्यात २०१४ मध्ये सत्तापरिवर्तन हाेऊन भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेला मंजुरी देण्यात आली हाेती. या रचनेचा भाजपला फायदा हाेऊन राज्यातील अनेक महापालिकांमध्ये कमळ फुलले हाेते. राज्य निवडणूक आयाेगाने वाॅर्ड रचनेला मंजुरी दिल्यानंतर भाजपच्या गाेटातून चिंतेचा सूर व्यक्त केला जात हाेता. बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयानंंतर भाजपमध्ये उत्साह पसरल्याचे बाेलल्या जात आहे.
सरकारच्या निर्णयांत बदल
२०१९ मध्ये राज्यात शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१९ राेजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली हाेती. निवडणुका ताेंडावर येऊन ठेपल्या असतानाच आता सरकारने पुन्हा एकदा बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीवर शिक्कामाेर्तब केले,हे विशेष.
काॅंग्रेस द्विसदस्यीय प्रभागासाठी आग्रही
मनपा निवडणुकीसाठी काॅंग्रेस पक्ष द्विसदस्यीय प्रभाग रचनेकरीता आग्रही हाेता. यासंदर्भात २० सप्टेंबर राेजी मुंबईत पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतही द्विसदस्यीय प्रभाग रचनेला मंजुरी देण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.