अकोला : मध्य रेल्वे भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, ६ मे रोजी ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे. परिणामी या दिवशी वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस व नाशिक-बडनेरा मेमू प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सहा अन्य एक्स्प्रेस गाड्या रेग्यूलेट करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या भूसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून शनिवारी जारी पत्रकानुसार, नांदुरा ते जलंब स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, ६ मे रोजी अप व डाऊन मार्गावर १४:२० ते १६:६० वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १११२१ व १११२२ वर्धा- भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस व गाडी क्रमांक ०१२१२ व ०१२१२ नाशिक-बडनेरा-नाशिक मेमू ६ मे रोजी प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्या केल्या रेग्यूलेट
गाडी : रेग्यूलेट कालावधी०७११६ जयपूर-हैदराबाद विशेष - ०२. ४५ तास२०८०४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस - ०२.०० तास०११४० मडगांव-नागपूर विशेष - ०१.४५ तास११०४० गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस - ०१.०० तास०१३६६ बडनेरा-भुसावळ मेमू - ०१.१० तास१२४८५ नांदेड-श्री गंगानगर एक्स्प्रेस - ००. ३५ मिनिटे