लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात इशान्य पावसाची रिपरिप वाढली असून, मगील चोविस तासात पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हयात सर्वाधिक ३८.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. अकोला रि परिप सुरू आहे. दुपारनंतर येथे एक तास बर्यापैकी पाऊस झाला. हा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत राहील असा अंदाज आहे.तर नियमित नैऋत्य मान्सून महाराष्ट्रातून १५ ऑक्टोबरनं तर परतीच्या प्रवासाला निघेल असा अंदाजही कृषी हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.सद्या देशाच्या इशान्य भागाकडून दक्षिणेकडे वारे वाहत असून, कर्नाटक,चेन्नई, तेलंगण या भागात हवेचा दाब निर्माण झाला आहे. हवेचा दाबामुळे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी विदर्भात इशान्य पाऊस होत आहे.हा पाऊस रविवार पर्यंत १५ ऑक्टोबरपर्यंत असेल. दरम्यान, मागील चेाविस तासात सांयकाळी ५.३0 वाजतापर्यंत विदर्भात सर्वाधिक पाऊस अमरावती येथे ३८.८ मि.मी.पडला. अकोला येथे ३.४ मि.मी., बुलडाणा येथे ४.0 मि.मी.,चंद्रपूर ५.२ मि.मी., ब्रम्हपूरी ४.८ मि.मी. गोदिंया येथे ३.२ तर वर्धा येथे 0.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
अकोल्यात दुपारनंतर जोरदार अकोल्यात रविवारी रात्रभर पावसाची हलकी रिपरिप सुरू होती. सोमवारी दुपारनंतर अचानक मेघ दाटून आले.अकोला शहरासह ्रजिल्हयातील काही भागात एक ते दिड तास जोरात पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
विदर्भात येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत इशान्य पाऊस राहील,त्यानं तर पाऊस कमी होईल. नियमित नैऋत्य मोसमी पाऊस १५ ऑ क्टोबरनंतर राज्यातून परतीच्या प्रवासाला निघेल तसे हवामान तयार होत आहे.- डॉ. आर.एन. साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ, पूणे.