शिर्ला: पातुरच्या मनात्मा गॅस एजंसी वर ग्राहकांची गर्दी झाल्याने संचारबंदी बंदीचा फज्जा उडाल्याचे वृत्त लोकमतने ३० मार्च रोजी प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत तहसिलदार,ठाणेदारांनी एजन्सी मालकाला ठाण्यात बोलावून खडसावले. तसेच घरपोच सिलेंडर न दिल्यास कडक कारवाई चे संकेत दिले.पातुरातील मनात्मा गॅस एजंसीच्या गोडावूनवर रविवारी ग्राहकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे, आचारसंहीतेचा फज्जा उडाला. तसेच सोशल डिस्टन्सही ठेवण्यात आला नाही.याविषयी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ठाणेदार आणि तहसीलदारांनी गॅस एजन्सी मालकाला ठाण्यात बोलावून खडसावले. ग्राहकांना घरपोच सिलेंडर मिळाले नाही तर सुद्धा कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला. घरपोच गॅस सिलेंडर मिळण्यामध्ये गॅस एजन्सीद्वारे कार्यक्षेत्रातील ग्राहकांना अडचण आल्यास त्यांनी थेट तालुका प्रशासनाची संपर्क साधावा असे आवाहन पातुर तहसीलदार दीपक बाजड तथा पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी केले आहे.