अकोला : मुळचे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील व सद्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ‘अरेबियन बिझनेस’ या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष २०२० साठीची ही यादी ‘द इंडियन बिलीयनर्स क्लब’ या शीर्षकाखाली नुकतीच प्रसिद्ध केली. गेल्या वर्षी या यादीत डॉ. दातार सोळाव्या क्रमांकावर होते. केवळ वर्षभरात त्यांनी व्यवसायाची प्रगती व विस्तार परिश्रमपूर्वक घडवत आखाती प्रदेशातील (जीसीसी रीजन) आघाडीच्या १० अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवले आहे. जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर डॉ. दातार यांनी गेल्या ३६ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला आहे. ते मूळचे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील आहेत. गत अनेक वर्षांपासून ते दुबई येथे स्थायीक झाले आहेत.
वाशिम जिल्ह्याचा सुपूत्र आखाती देशातील भारतीय अब्जाधीशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:33 AM
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
ठळक मुद्दे‘द इंडियन बिलीयनर्स क्लब’ या शीर्षकाखाली नुकतीच यादी प्रसिद्ध केली. डॉ. धनंजय दातार हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील आहेत.