संतोष मुंढे/ वाशिम वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा येथील एका शेतकर्याने परिश्रमातून उजाड माळराण फुलविण्याची किमया करुन दाखविली आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या म्हणीप्रमाणे त्यांची नऊ एकर बाग कष्टाने बहरली आहे.तुकाराम सखाराम वाशिमकर हे केकतउमरा येथील एक संघर्षशील व्यक्तीमत्व. त्यांनी वाशिम ते केकतउमरा मार्गावरील १९ एकर माळरान काही वर्षांपूर्वी अल्पदरात विकत घेतले. खडकाळ जमीन घेवून वाशिमकरांनी काय साधले, असा प्रश्न त्यावेळी त्यांच्या परिचितांनी केला; परंतू वाशिमकरांनी अथक परिश्रमातून या माळराण जमीनीत खड्डे करुन चिकू, सिताफळ, पेरु, निंबू या फळपिकांसह सागवानाचीही लागवड केली. १९ एकरापैकी नऊ एकरावर फळबागेची लागवड करतांना त्यांनी आं तरपिक पध्दतीचा अवलंब केला. त्यांच्या समाजसेवी वृत्तीचा परिचयही गावकर्यांना नेहमी येतो. पाणीटंचाईच्या काळात ते गावकर्यांना मोफत पाणी पूरवठा करण्याचे कामही करतात.
वाशिमकरांच्या श्रमाने माळराणही फुलले
By admin | Published: October 09, 2014 11:48 PM