शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

असली तृतीयपंथींनी केली नकलींची धुलाई..!

By admin | Published: May 08, 2017 2:46 AM

तृतीयपंथींमधील वाद: महागात पडली वसुली; कपडे फाडून केस कापले!

अकोला : बोगस तृतीयपंथी बनून दुकानदारांकडून जबरदस्तीने वसुली करणे तीन युवकांना चांगलेच महागात पडले. बोगस तृतीयपंथी असली तृतीयपंथींनी चांगलेच चोपून काढल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता खुले नाट्यगृहासमोर घडली. असली तृतीयपंथींनी बोगस तृतीयपंथींना चोपच दिला नाही, तर त्यांचे कपडे फाडून केससुद्धा कापून टाकले. असली-नकली तृतीयपंथींमधली फ्रिस्टाइल पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या फ्रिस्टाइलमुळे नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले. रविवारी खुले नाट्यगृहासमोरील बाजारपेठेतील गर्दी पाहता, तीन युवकांनी तृतीयपंथींचा वेश धारण केला आणि बाजारात फिरून दुकानदारांकडे त्यांच्यासमोर टाळय़ा वाजविण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मागण्यास सुरुवात केली. तृतीयपंथींच्या वेशातील हे तीनही युवक दारूच्या नशेत धुंद होते. दरम्यान, याच रस्त्यावरून असली तृतीयपंथी ऑटोरिक्षामधून जात होते. त्यांना बोगस तृतीयपंथींचे कृत्य दृष्टीस पडले. या तृतीयपंथींनी चालकास ऑटोरिक्षा थांबवायला सांगितला. पाचही तृतीयपंथी ऑटोरिक्षातून उतरले आणि त्यांनी बोगस तृतीयपंथी बनलेल्या तीनही युवकांना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांची धुलाई करण्यास सुरुवात केली. असली तृतीयपंथींकडून तीन युवकांना होत असलेली मारहाण पाहून, नेमका काय प्रकार सुरू आहे, हे नागरिकांना लक्षात आले नाही. बर्‍याच वेळानंतर नागरिकांना असली तृतीयपंथींचे कपडे फाडून त्यांना अर्धनग्न केल्यानंतर सुरू असलेल्या प्रकार लक्षात आला. संतप्त तृतीयपंथींनी एका दुकानातून कैची आणून बोगस तृतीयपंथी बनलेल्या तीनही युवकांच्या डोक्यावरील वाढलेले केस कापून टाकले. युवकांना चांगलाच चोप मिळाल्यानंतर या युवकांनी तृतीयपंथींच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून घेत पळ काढला. असली तृतीयपंथींकडून बोगस तृतीयपंथींना मारहाणीची ही पहिली घटना नाही. यापूर्वीसुद्धा बाळापूर रोडवर नागरिकांकडून वसुली करणार्‍या बोगस तृतीयपंथी बनलेल्या दोन युवकांना असली तृतीयपंथींनी चोपले होते.