अकोला: कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत आहे. या ठिकाणी साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने घाण दुर्गंधीने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मनपाच्या हद्दवाढीनंतर शहराचा पाच पट झालेला विस्तार व कचºयाची समस्या लक्षात घेता, कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. मागील अनेक महिन्यांपासून घनकचºयाचा ‘डीपीआर’ खोळंबला असून, या मुद्यावर प्रशासन व सत्ताधाºयांमध्ये आपसात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.शहरातून निघणाºया दैनंदिन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नायगावातील १२ एकर जागेवरील ‘डम्पिंग ग्राउंड’चा वापर केला जातो. कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे या ठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कचºयामुळे परिसरातील पाण्याचे जलस्रोत दूषित झाले आहेत. त्यामुळे शहरातून कचरा घेऊन जाणाºया मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, मारहाण करण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’ वरील कचºयावर ठोस प्रक्रिया करण्याची गरज असताना या मुद्यावर मनपा प्रशासन व सत्ताधारी पक्षात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी शासनाने अमरावती विभागाकरिता ‘मार्स प्लानिंग अॅन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रा. लिमिटेड अहमदाबाद’ या संस्थेची नियुक्ती केली. मध्यंतरी संस्थेने तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने त्रुटी काढल्याने हा अहवाल रखडला होता. सदर डीपीआरचे पुढे काय झाले, याबद्दल प्रशासनात कमालीचा गोंधळ आहे. एकूणच शहरातील कचºयाच्या समस्येवर प्रशासनासह सत्ताधारी पक्ष कवडीचेही गंभीर नसल्याचा आरोप होऊ लागला आहे.झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चा प्रयोग फसला!शहरात तयार होणाºया दैनंदिन कचºयावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत घनकचºयाचा डीपीआर तयार नसताना महापालिका झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला पूर्व झोनमध्ये डम्पिंग ग्राउंडची निर्मिती करण्यात आली होती. हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. हा प्रकार कमी म्हणून की काय, घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून मोकळे होत असल्याने अकोलेकरांना वैताग आला आहे. या समस्येकडे सत्ताधारी डोळेझाक करीत असल्याचा सूर शहरात उमटत आहे.