--बॉक्स--
अशा आहेत सूचना
कृषी केंद्र धारकांनी बियाणे व खते विक्रीपूर्वी परवाना नूतनीकरण करून दर्शनी भागात लावावा, साठा व भाव फलक अद्यावत करून लावावा, शेतकऱ्यांना एम फार्म या विहित नमुन्यातील स्वाक्षरी केलेले, सर्व नोंदी घेतलेले बिल देण्यात यावे, विक्रेत्याने खरेदी केलेल्या बियाणे व खताचे बिल, डिलेव्हरी चलन व फाईल अद्यावत करावी. विक्रीकरिता असलेले सर्व बियाणे, खताचे स्त्रोत व संपूर्ण अभिलेख अद्यावत ठेवून बियाणे, खते विक्रीचा अहवाल परवाना अधिकारी यांना दरमहा सादर करावा, बियाणे व खतांमध्येही कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही तसेच ज्यादा दराने किंवा इतर निविष्ठा सोबत लिकिंग करून विक्री होणार नाही, याबाबत विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहे.
--कोट
सर्व तालुकास्तरावर भरारी पथक नेमले आहे. बियाणे, खतांच्या विक्रीवर ही पथके लक्ष ठेवून आहे. कुठल्याही प्रकारची भेसळ, जादा दराने विक्री आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी