लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर महसूल विभागातील ७0 अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक सोमवारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचे लक्ष (वॉच) राहणार आहे.अकोला शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील ११ झोनमध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, अन्न-धान्य वितरण अधिकारी रमेश पवार, तहसीलदार पी.यू. गिरी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून व तलाठी इत्यादी संवर्गातील ६५ अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे गणेश विसर्जन मिरवणुकीवर नियंत्रण राहणार असून, संपूर्ण मिरवणूक मार्गावर अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार राजेश्वर हांडे यांचे नियंत्रण राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या नियंत्रणात कक्ष कार्यान्वित राहणार आहे.
रंगरंगोटी कशासाठी?निमवाडी परिसरात नदीपात्र दूषित झाले आहे. तरी सुद्धा याठिकाणी पायर्यांची रंगरंगोटी करण्यात आली. नदीपात्रात घातक रसायन असून, पाण्यात उतरणेही आरोग्यासाठी घातक आहे. अशावेळी भक्तिभावात दंग होणार्या गणेश भक्तांनी दूषित पाण्यात गणेश विसर्जन करायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
चार ठिकाणं संवेदनशीलगणेश विसर्जन मिरवणुकीत ५0 मंडळं सहभागी होण्याची शक्यता आहे. मिरवणूक मार्गावरील चार ठिकाणं संवेदनशील आहेत. यामध्ये जामा मस्जीद (अलका बॅटरी), माळीपुरा चौक, जामा मस्जीद (तेलीपुरा चौक) व कच्छी मस्जीद (ताजना पेठ) या ठिकाणांचा समावेश आहे.