- संतोष येलकरअकोला : वडील चौकीदारीचे काम आणि आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक करून मोलमजुरी करीत असताना, गरिबीवर मात करून अकोल्यातील न्यू ईरा हायस्कूलची साक्षी सुधीर पाटणी या विद्यार्थिनीने इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात ५६.६० टक्के गुण प्राप्त करून यशाची भरारी घेतली आहे.अकोला शहरातील सिंधी कॅम्पस्थित आदर्श कॉलनी भागात राहणाºया साक्षीचे वडील सुधीर पाटणी चौकीदारीचे काम करतात आणि आई शोभा दुसºयाच्या घरी स्वयंपाक करून मोलमजुरीचे काम करते. आई-बाबा मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रचंड गरिबीची असताना ‘साक्षी’ने न्यू ईरा हायस्कूलमधून इयत्ता दहावीची परीक्षा दिली आणि परीक्षेच्या निकालात साक्षी पाटणी या विद्यार्थिनीने ५६.६० टक्के गुण प्राप्त करून यश मिळविले.कोणतीही शिकवणी नाही; अभ्यासावरच मिळविले यश!कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने ‘साक्षी’ने कोणत्याही विषयाची शिकवणी लावली नाही. कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता, दररोज नियमित चार ते पाच तास केलेल्या अभ्यासाच्या आधारेच ‘साक्षी’ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळविले.डॉक्टर बनून गरिबांची सेवा करायची आहे - साक्षीविज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मला डॉक्टर बनायचे आहे. डॉक्टर होऊन गरिबांची सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे, असा मानस ‘साक्षी’ने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.