अकोला: शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा रविवारी सायंकाळपर्यंत २९.५९ टक्क्यांवर पोहोचला. दगडपारवा धरणात जलसाठा मात्र अद्यापही लघुत्तम पातळीखालीच आहे. गत १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला. संततधार पाऊस बसरल्याने लहान नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ातही वाढ झाली. रविवार, २0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात २९.५९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला. तसेच मोर्णा, निगरुणा, उमा, वान व पोपटखेड धरणांमधील जलसाठय़ातही वाढ झाली. दगडपारवा धरणात मात्र अद्यापही जलसाठा लघुत्तम पातळीखालीच असल्याचे चित्र आहे.
काटेपूर्णा धरणातील जलसाठा ३0 टक्के
By admin | Published: September 21, 2015 1:35 AM