अकोला : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये दररोज श्रमदान होत आहे. महाराष्टÑदिनानिमित्त सहा गावांमध्ये महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हाभरातील १२ हजार जलमित्रांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार जलमित्रांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष श्रमदान करून जलक्रांतीसाठी आपला सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी नरेंद्र पापडकर, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे आदींसह इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी श्रमदान केले.
जांभरुण येथे जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे श्रमदानपातूर: तालुक्यातील जांभरुण येथे १ मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाºयांसह इतर अधिकाºयांनी श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह वाढवला.जांभरुण येथे आयोजित महाश्रमदानात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी रोहयो मनोज लोणारकर, उपजिल्हाधिकारी लोणीकर, तहसीलदार दीपक बाजड, गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, मृदसंधारण विभागाचे बोके, वनपरिक्षेत्र सहायक संचालक वळवी, आलेगाव व पातूर आरएफो सामदेकर, नालिंदे ,पातूरचे ठाणेदार जीएम गुल्हाने यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. सकाळी सहा वाजतापासून तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था व नोंदणी केलेले जलमित्र मोठ्या संख्येने श्रमदानाकरिता उपस्थित होते. वाडेगाव जागेश्वर विद्यालयातील तीनशे विद्यार्थी व कर्मचारी, अकोल्यातील डवले महाविद्यालयाचे पूर्ण कर्मचारी, तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, महिला आर्थिक विकास मंडळातील बचत गट, शासनाच्या उमेद प्रकल्पातल्या महिला, पातुरातील विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी व शिक्षक, नगर परिषदेच्या अध्यक्ष प्रभा कोथळकर तसेच तालुक्यातील विविध मान्यवर यांनी उपस्थित राहून श्रमदान केले. सकाळी नऊच्या दरम्यान जिल्हाधिकाºयांनी स्वत: श्रमदान केले. त्यांनी जांभरुण परिसरातील सुरू असलेल्या श्रमदानाच्या प्रत्येक टीमला स्वत: प्रत्यक्ष भेटून त्यांच्यासह श्रमदान केले तसेच त्यांच्याबरोबर संवाद साधला. यावेळी चार हजार श्रमदात्यांनी शेतीमधील ढाळीचे बांध, दगडी कंटूर बांध, सलग समतल चर या उपचारावरती श्रमदान केले. या यावेळी विविध मान्यवरसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.