शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
2
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
3
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
4
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
5
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
6
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
7
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
8
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
9
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
10
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
11
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
12
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
13
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
14
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
15
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
16
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
17
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
18
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
19
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
20
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार

Water cup competition : सहा गावात येणार श्रमदानाचे तुफान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 4:18 PM

अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये १ मे महाराष्ट्र दिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देश्रमदान करण्यासाठी जिल्ह्यातील १२ हजार २१ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. धाडी, अडगाव, कोठा, जांभरून, गोरव्हा, सायखेड या गावांचा समावेश आहे.गावात मजुरी करणारे ग्रामस्थ दररोज नियमित श्रमदान करीत आहेत.

- संदीप वानखडे

अकोला: गेल्या काही वर्षांपासून अल्प पाऊस होत असल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सहा गावांमध्ये १ मे महाराष्ट्र दिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाश्रमदासाठी जिल्ह्यातील १२ हजार २१ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. जलमित्रांसह अधिकारी, पदाधिकारीही श्रमदानात सहभाग घेणार आहेत.जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये ८ एप्रिलपासून वॉटर कप स्पर्धेस सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेली गावे पाणीदार करण्यासाठी श्रमदान करीत आहेत. येत्या १ मे रोजी जिल्ह्यातील सहा गावांमध्ये महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान करण्यासाठी जलमित्रांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील १२ हजार २१ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. श्रमदान होणाºया गावांमध्ये अकोट तालुक्यातील रुधाडी, तेल्हारा तालुक्यातील अडगाव, कोठा, पातूर तालुक्यातील जांभरून आणि बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा, सायखेड या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये श्रमदानाचे महातुफान येणार आहे. महाश्रमदानात त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी सहभाग घेणार आहेत. तसेच जांभरुण येथे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी लोणारकर आदी मान्यवर श्रमदान करणार आहेत.अकोट तालुक्यातील रुधाडी हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य असलेल्या गावात मजुरी करणारे ग्रामस्थ दररोज नियमित श्रमदान करीत आहेत. त्याची दखल घेऊन या गावाची महाश्रमदानासाठी निवड करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथे दरररोज नियमित श्रमदान होत आहे. कोठा हे खारपाणपट्ट्यातील छोटेशे गाव श्रमदानासाठी एकजूट झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पातूर तालुक्यातील जांभरून येथे फासेफारधी समाजाचे वास्तव्य आहे. येथील पानदेव टेकडी प्रसिद्ध आहे. पाणलोटच्या उपचारासाठी टेकडीचा लाभ होणार आहे. त्यामुळे या गावाची निवड करण्यात आली आहे. गोरव्हा आणि सायखेड येथे मजुरी करणारे ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. त्यामुळे तेथेही महाश्रमदान होणार आहे.अशी झाली जलमित्रांची नोंदणीतेल्हारा - ४०४१बार्शीटाकळी - ३३००अकोट - २३४१पातूर - २३३९श्रमदानातून ही होतील कामेया महाश्रमदानातून समतल चर, दगडी बांध, माती नाला बांध, कंटूर बांध आदी जलसंधाणाच्या उपचाराची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सहा गावांमध्ये हजारो जलमित्र एकाच वेळी श्रमदान करणार आहेत. तसेच या श्रमदानात वकील संघटना, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, बचत गटातील महिला, पोलीस प्रशासन, अधिकारी, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.जलसंधारणाची चळवळ लोकांनी आपली म्हणून स्वीकारली आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. तुमचे दोन हात आणि दोन तास जलक्रांती घडवू शकतात. त्यासाठी महाराष्ट्र दिनी चारही तालुक्यांमध्ये जलमित्रांसह ग्रामस्थांनी श्रमदान करून जलक्रांतीमध्ये आपले योगदान द्यावे.नरेंद्र काकड, जिल्हा समन्वयक , पाणी फाउंडेशन

 

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा