कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पाण्याचे वाटप करण्यात आहे. यावेळी तालुका प्रमुख मनोज वानखडे, आदित्य भूईकर, हिमांशू खेडकर, कार्तिक धानोरकर, रंजीत भूईकर, लकी चव्हाण, गौरव कांबळे, निखिल कांबळे आदित्य वरघट, ऋषिकेश बन्सोड, सूरज कांबळे, हर्षल इंगळे, सौरभ खाडे आदी उपस्थित होते. (फोटो)
--------------------------------
वन्य प्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित
पातूर: गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली; मात्र जंगली जनावरांचा त्रास वाढल्याने शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकाची राखण करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. वन्य प्राण्यांचा वाढता संचार मारक ठरला आहे.
------------------------------
मोबाईलच्या अतिवापराने दृष्टिदोष
तेल्हारा: मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्जन होऊन दृष्टिदोषाच्या आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि शाळेतच दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
-----------------------
निराधार, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा!
बार्शीटाकळी: जिल्ह्यातील निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी होत आहे. निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी विविध पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे.
-------------------
कचरा पेट्यांची व्यवस्था करावी
अकोट: येथील काही वाॅर्डामध्ये न.प.च्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेला वारंवार मागणी करूनही व्यवस्था करण्यात आली नाही.
-----------------------
ढगाळ हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला!
मूर्तिजापूर: गत अनेक दिवसांपासून नियमितपणे ढगाळ व दमट हवामान आहे. परिणामी फुलझाडे व फळबागांवर किडींचे व रोगराईचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता कीडनाशक फवारणी करून परसबाग सुरक्षित करीत आहे. अनेक दिवसांपासून या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.
----------------------------
शेतशिवारात पीक काढण्याची लगबग
बाळापूर: बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमूग पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी कामात व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे. मात्र, पिके काढण्याची अंतिम लगबग सुरू असली, तरी शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
--------------------------