शिर्ला (अकोला) : गत 16 वर्षापासुन पाण्याअभावी बंद पडलेला कोट्यावधी रुपयांचा केंद्रीय रेशीम बोर्डाचा प्रकल्प पाणी फाऊंडेशनच्या विशेष प्रयत्नानी कार्यान्वीत होणार आहे. केंद्र सरकारच्या रेशीम बोर्डाने विदर्भातील शेतकरी पारंपरिक पीक पध्दतीने खचुन गेल्याने नविन शाश्वत ऊत्पन्न स्त्रोताचा रेशीम शेतीचा पर्याय देण्यासाठी अकोला जिल्हय़ातील शिर्ला येथे चीन_भारत आपसी सामंजस्य करारानुसार कोट्यवधी खर्चून रेशीम शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारले. रेशीम शेती विस्ताराची प्रचार प्रसाराची प्रकिया चार वर्षे जोमाने चालली. शेतकरी रेशीम शेतीकडे वळु लागले. मात्र अचानक भुगर्भातील जलसाठा कमी झाला आणी रेशीम प्रकल्प पाणी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला. अल्पावधीतच प्रकल्पाची वाताहत झाली. अखेर हा प्रकल्प तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बारामती येथे हलविला. इमारती भग्नावस्थेत गेल्या आणी हे अवशेष राज्य शासनाच्या रेशीम संचालनालयाला करावर चालविण्यास दिले. आधिच पाण्याचे दुर्भिक्ष त्यामुळे ह्यातील शेती क्षेत्र पडिक जमीनीत बहुतांश भाग परावर्तीत झाला. शेतकरी दुर गेला. मात्र गत वर्षी जलयुक्त शिवार योजना आली परीसरात जलसंधारणाची विविध कामे झाली. परिसरात पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झाली. ह्या वर्षी अमीर खान प्रणीत पाणी फाऊंडेशन आले. शिर्लाच्या युवकांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षित युवकांनी सोबत घेउन गावातील सचिन कोकाटे.संतोषकुमार गवई ह्यांनी रेशीम फार्म प्रमुख श्री. झलके ह्यांची भेट घेतली. रेशीम शेतीचे वैभव जलसंधारण विविध ऊपचारातुन कसे आणायचे याची शास्त्रशुध्द योजना मांडली. श्री झलकेनी वरिष्ठाकडुन परवानगी मिळवली. पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी 8 एप्रिलला शुभारंभासाठी अकोला जिल्हाधिकारी जी.श्रीकांत ह्यांना बोलवले. आणि महाश्रमदानाने रेशीम प्रशिक्षण केंद्राचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात केली. बघता बघता आता पर्यंत ह्या क्षेत्रावर कंपार्टमेट बंडीग. कंट्रोल बांध. अनघा दगडी बांध. समतल चर.खोल चर.व्हॅट. शेततळे. विहिर पुनर्भरण. आदि. विविध जलसंधारणाचे उपचार ह्या क्षेत्रात करण्यात आले. पाणी फाऊंडेशनच्या प्रशिक्षणामूळे गावकरी हा बदल घडवु शकले. परीणामी हा विदर्भाचा रेशीम प्रकल्प शेतकऱ्याना रेशीम शेतीचा शाश्वत मार्ग दाखवण्यासाठी पुन्हा ऊभा राहु शकला.अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या चळवळीमुळे.
पाणी फाऊंडेशनमुळे रेशीम शेती प्रशिक्षण केंद्राचा चेहरा मोहरा बदलणार!
By admin | Published: April 28, 2017 11:32 AM