लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काटेपूर्णा धरणातील पाणी रविवार, १५ डिसेंबरपासून सिंचनासाठी सोडण्यात आले असून, प्रतिसेंकद ४० (क्युसेस) घनमीटर असे हे सुरुवातीचे प्रमाण आहे; परंतु कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे अर्धवट असल्याने यातील किती पाणी ( हेड टू टेल) शेवटच्या शेतापर्यंत पोहोचते की नाही, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गतवर्षी धरणात अपेक्षित पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. यावर्षी मुबलक पाऊस झाला असून, धरणातही मुबलक जलसाठा असल्याने पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे; परंतु सोडण्यापूर्वी कालवे, वितरिका, पाटचाºयांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागतात. तेव्हाच पाणी सोडले जाते.तथापि, यावर्षी देखभाल दुरुस्तीचे नियोजनच रखडल्याने आता कुठे भारतीय जैन संघटना व पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून कामे केली जात आहेत. सध्या बहादूरपूर कालवा, वितरिका व लघू कालव्याच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.काटेपूर्णा धरणांतर्गत ८ हजार ३२५ हेक्टर सिंचन लाभक्षेत्र आहे. त्यासाठी आणखी पाणी सोडावे लागणार आहे. काटेपूर्णा प्रकल्पावरील उन्नई बंधारा खांबोरा येथून सुरुवातीला प्रतिसेकंद ४० घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे.यावेळी काटेपूर्णा प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे, उपविभागीय अधिकारी अभिजित नितनवरे, शाखाधिकारी नीलेश घारे, अन्वीचे उपसरपंच प्रशांत नागे, कुकडे, सदार, पवार आदी शेतकरी उपस्थित होते. सिंचन कायदा २००५ व नियम २००६ नुसार शेतकºयांनी काटकसरीने पाणी वापरून टेल टू हेड या संकल्पनेवर भर देत पाण्याचा वापर करावा, असे आवाहन तायडे यांनी केले.लाभ क्षेत्राबाहेरील शेतकºयांना फायदा होणार!ठिबक व तुषार सिंचनामुळे लाभक्षेत्रातील शेतकºयांना तर याचा फायदा होतच असून, लाभक्षेत्राच्या बाहेरील शेतकºयांचासुद्धा चांगलच फायदा होत असल्याने ओलीत क्षेत्रफळात वाढ होत आहे; परंतु या प्रकल्पाच्या पाण्यावर बिगर सिंचनाचे आरक्षणही वाढले असून, हे असेच चालू राहिल्यास शेती सिंचनाला अपेक्षित पाणी मिळणार की नाही, हा धोका शेतकºयांना वाटत असल्याचे तायडे म्हणाले. जलसंपदा विभागाने याकडे लक्ष केंद्रित करू न सिंचनाचा शेतकरी कोटा कयम ठेवावा, ही शेतकºयांची मागणी आहे.३२ पाणी वापर संस्था काटेपूर्णा प्रकल्पावरील हेड टू टेल एकू ण ३२ पाणी वापर संस्था असून, ८३२५ हेक्टर प्रवाही सिंचनाची मर्यादा आहे. पाणी वापर संस्थांच्या चळवळीतून काटेपूर्णा प्रकल्पावरील पीक पद्धतीत मोठा बदल आणल्यामुळे सिंचनाची पद्धतसुद्धा बदलली आहे. नवीन तंत्रज्ञानाची शेतकºयांनी जोड घेऊन उपसा सिंचन तुषार व ठिबक सिंचनाचा वापर पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून प्रकल्पावर केला जात आहे.
देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, बहादूरपूर शाखा कालवा, वितरिका,लघू कालव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. इतर कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. सध्या शेतकºयांकडून पाण्याची मागणी नाही. म्हणून प्रतिसेकंद ४० घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. प्रतिसेकंद १२० घनमीटरपर्यंत पाणी सोडण्याची मर्यादा आहे. मागणी बघून निर्णय घेण्यात येईल.- उपविभागीय (अभियंता) अधिकारी,काटेपूर्णा प्रकल्प, उपविभाग, बोरगावमंजू.