या परिसंवादाचे उद्घाटनासह अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. वडतकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त उपसंचालक शशांक देशपांडे उपस्थित होते. त्यांनी Water Resources in Maharashtra या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच Artificial recharge in groundwater या विषयावर सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. सुभाष टाले यांनी मार्गदर्शन केले, तर वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी भूजलाची यशोगाथा दाखवून विद्यार्थ्यांना अवगत केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार आर. एम. भवाने यांनी केले.
सोमवारी झालेल्या परिसंवादात, जलसाक्षरता अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (ता. पातूर) येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिसंवादाला उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. राम खर्डे उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक राजीव गवई यांनी अकोला जिल्ह्यातील भूशास्त्रीय रचना याबाबत माहिती दिली. तसेच डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी पाण्याचा ताळेबंद याबाबत माहिती दिली, तर वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी विहिरींची पत्रिका समजावून सांगितली.
दुपारच्या सत्रात सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. बी. उंदीरवाडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उदय पाटणकर यांनी छतावरील पाऊस पाण्याचे संकलन व पुनर्भरण याविषयी माहिती दिली. या परिसंवादामध्ये ८२ विद्यार्थी सहभागी झाले होते. सरद परिसंवाद हा Zoom वर आयोजित करण्यात आला होता, तसेच You tube वर प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये १३३ विद्यार्थ्यांनी You tube वर सहभाग दर्शविला. या आभासी परिसंवादाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आर. एम. भवाने यांनी करीत सर्वांचे आभार मानले.