शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

जलव्यवस्थापन समितीकडून कोट्यवधींची खिरापत!

By admin | Published: November 08, 2016 2:24 AM

कोल्हापुरी बंधा-यांचा निधी पाण्यात; जि.प.ला माहितीच मिळत नाही.

अकोला, दि. ७-जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण वाढून शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारण्याची उपाययोजना असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍यांतून एक हेक्टरही सिंचन झालेले नाही. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी मिळून लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) ला खिरापतीप्रमाणे वाटप केलेल्या ७0 बंधार्‍यांचा कोट्यवधीचा निधी आणि सद्यस्थिती काय आहे, याचीही कुठलीच माहिती नसल्याचे पुढे आले आहे. सिंचनाच्या सोयीमुळे शेतकर्‍यांचा विकास होतो, त्यासाठी शासनाकडून १00 हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या बंधार्‍यांची कामे जिल्हा परिषदेला दिली जातात. कोल्हापुरी बंधार्‍यांची मिळालेली कामे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने न करता ती लघुपाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) या विभागाला देण्यात जिल्हा परिषदेच्या तत्कालिन पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांनी कमालीची तत्परता दाखवली. गेल्या काही वर्षाच्या कार्यकाळात तब्बल ८४ कामे जिल्हा परिषदेने त्या विभागाला दिली. त्यासाठी शासनाकडून मिळालेला कोट्यवधींचा निधीही सोपवला; मात्र जी तत्परता काम देताना दाखवण्यात आली, तशी पूर्ण झालेला बंधारा सिंचनासाठी हस्तांतरित करून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकार्‍यांनी कुणीच दाखवली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून कामासाठी निधी घेणे आणि त्याची विल्हेवाट लावणे, एवढेच काम स्थानिक स्तरकडून झाले आहे. त्यामुळे पूर्ण झालेले बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करण्याऐवजी स्थानिक स्तरने स्वत:कडेच ठेवली. त्यातून शेतकर्‍यांच्या हिताविरुद्ध काम या विभागाने केले आहे. स्थानिक स्तर विभागाकडून केली जातात कामेजिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन आणि सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार स्थानिक स्तरकडे कामे दिली जातात. त्यासाठी ठराव घेता येतात; मात्र त्यानंतर कामांबाबतचा कोणताही पाठपुरावा किंवा गुणवत्तेचा आढावाही घेतला जात नाही, ही गंभीर बाबही घडत आहे. जलसंधारण समितीच्या सभेत कामांची कुठलीच माहिती लघुसिंचन, स्थानिक स्तर विभागाकडून दिली जात नाही, असेही वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.जिल्हा परिषदेची सत्ता शेतकरी हिताची की.?जिल्हा परिषदेत भारिप-बमसंसोबत मित्रपक्षांची सत्ता आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर सातत्याने शेतकरी हिताची भूमिका मांडतात. त्यासाठी लढाही देतात. त्याचवेळी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी शेतकरी हिताला मारक ठरणार्‍या कामांबाबत मौन पाळतात, हा विरोधाभासही यानिमित्ताने पुढे आला आहे.आतापर्यंत सभेसाठी माहिती आणण्याचे स्थानिक स्तरला सांगितले. आता पत्र देऊन संपूर्ण कामे, निधीबाबतची माहिती मागविण्यात येईल. - डॉ. सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.