संजय उमक
मूर्तिजापूर: तालुक्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे हाती घेऊन पूर्णत्वास नेण्यात आली आहे. तालुक्यात या अभियानांतर्गत ७४ कामे पूर्ण झाली आहे. यामुळे जलपातळी वाढल्याने शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने कृषी विभाग, जिल्हा परिषद, वनविभाग व पंचायत समिती यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यास मदत झाली.
सन २०१८-१९ मध्ये तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. यामध्ये धानोरा खुर्द, गणेशपूर, हयातपूर, इसापूर, जितापूर नाकट, मंडुरा, माटोडा, पिशवी, सैदापूर, सिकंदरपूर, सोनाळा, उमरी या १२ गावात अभियान राबवून येथील ढाळीचे बांध, शेततळे सिमेंट नाला बांधकाम, गाळ काढणे, नाला खोलीकरण व सरळीकरण, नाला दुरुस्ती, साखळी सिमेंट क्रॉंक्रीट नाला बांधकाम व रुंदीकरण, खोदतळे, ई क्लास शेततळे, गावतलाव दुरुस्ती. खोल सरळ समतल चर, रिचार्ज शाप्ट, विहीर व बोअरवेल पुनर्भरण आदी कामांचा समावेश असून यासाठी १७ लाख ३१ हजार खर्च करण्यात आला.
----------------
मधापुरी येथील तळे ठरले ‘मॉडल’!
भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने ‘सुजलाम् सुफलाम्’ या अभियानात तालुक्यातील मधापुरी, राजनापूर खिनखिनी, माना, जितापूर खेडकर, कंझरा, खापरवाडा, किनी फनी, या गावात कामे झाली आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. किनी फणी, राजनापूर, खिनखिनी येथे सर्वाधिक काम झाले आहे. मधापुरी येथे मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली असून, येथील तळे ‘मॉडेल’ ठरले आहे. मूर्तिजापूर तालुक्यात प्रशासकीय मंजुरी मिळालेले ७४ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी कामे पूर्ण करण्यासाठी गावाचा एक सर्व्हे करून तेथील गुरे, लोकसंख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आले आहेत. (फोटो)
-----------------
जलयुक्त शिवार अभियान अभियानांतर्गत ही कामे राबवली जातात २०१८-१९ च्या अभियानात ७४ कामे पूर्णत्वास गेली आहेत. यात शेततळे व नाले खोलीकरण महत्त्वाचे ठरले. या कामाचा जलपूर्तीनिर्मिती अहवाल सादर करण्यात आला. गतवर्षी पासून अभियान शासन स्तरावर बंद आहे.
- अमृता काळे,
तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर