अकोला, दि. ५ : मनपा क्षेत्र वाढल्याने शहरालगतच्या तहानलेल्या गावांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार असल्याने काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या काटेपूर्णा धरणातील जलसाठा वाढताच असून, शुक्रवारी या धरणाचा जलसाठा ८८ टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, जलसाठा वाढताच शेतकर्यांनी आताच खरीप हंगामातील पिकांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तर जिल्हय़ातील उमा, निगरुणा धरणे शंभर टक्के भरली असून, पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा २४.७२ दलघमी म्हणजेच (५९.६२ टक्के) झाला आहे. निगरुणा २८.८५ दलघमी (१00 टक्के) जलसाठा असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा ११.६८ दलघमी (१00 टक्के) आहे. तेल्हारा तालुक्यातील वान ७२.९४ दलघमी (८९.00 टक्के), तर बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणात ४.४८ दलघमी म्हणजेच ४३.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. ३१ लघू प्रकल्पांपैकी २0 प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे धरणात मुबलक जलसाठा संकलित न झाल्याने रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी मिळाले नाही. यावर्षी प्रथमच ८८ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. त्यामुळे पिकांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२४ गावांच्या पाण्याची सोय महापालिकेची हद्दवाढ झाल्याने महापालिका क्षेत्रात आता २४ गावांचा समावेश झाला आहे. या चोवीस गावातील बहुतांश गावात अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. अकोला शहराला लागूनच असलेल्या गुडधी गावात तर अद्यापही पाणी पुरवठा सुरू झाला नसल्याने येथील नागरिकांना वर्षानुवर्षे खारपाणपट्टय़ातील नागरिकांला हातपंपाचे खारे पाणी सेवन करावे लागत आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार आहेत; पण गोडेपाणीच नसल्याने येथील नागरिकांसमोर खार्या पाण्याचा पर्याय आहे. या पाण्याचे दुष्परिणाम नागरिकांना सोसावे लागत आहेत. त्यामुळे मन पाला काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार असून, या गावांची पिण्याच्या पाण्याची सोयही करावी लागणार आहे.
काटेपूर्णा धरणात वाढवावे लागेल पाण्याचे आरक्षण!
By admin | Published: September 06, 2016 2:23 AM