साहेबराव गवई / विझोरा (जि. अकोला)भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत असतानच डोंगरमाथ्यावर जलस्रोत आढळून आला आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील अजनी बु. येथे केवळ तीन फूट पाणी लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. दुष्काळात तीन फुटावर झरा लागल्याने अनेक जण आश्चर्यचकीत झाले आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातीत ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणच्या कूपनलिका व विहिरी आटल्या आहेत. बाराही महिने पाणी असणार्या विहिरीही आटल्या आहेत. अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी मिळणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत असतानाच अजनी येथे जलस्रोत आळल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. पाणी पिण्यास योग्यअजनी बु. गावाशेजारील टेकड्यांच्या पायथ्याशी पाण्याचे झरे आढळून आले आहेत. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अजनी बु. परिसरातील गावांत भीषण पाणीटंचाई आहे. गाव परिसरातील विहिरी व कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे या नवीन जलस्रोतून पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आता होत आहे. असे आढळून आले पाण्याचे स्रोतअजनी बु. येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे सुरु आहेत. यंत्राद्वारे काम सुरू असताना तीन फुटावर जमिनीत ओलावा असल्याचे समोर आले. त्यानंतर खाली खोदले असता, पाण्याचा स्रोत आढळून आला. सरपंच वर्षा चव्हाण यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांच्या सुचनेवरून येथे शेततळ्यासारखी खोदकामे करण्यात आली आहेत. सध्या तेथे पाणी साठले आहे.
डोंगरमाथ्यावर आढळला जलस्रोत
By admin | Published: May 03, 2016 2:09 AM