ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारपंप जळाल्याचे कारण देत ग्रामपंचायतीकडून गत १० ते १५ दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद आहे. ऐन पावसाळ्यात व शेतीमशागतीची कामे सुरू असताना नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोलमजुरी सोडून नदीवर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. गावातील पथदिवेही बंद असून, रात्री गावातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य श्रीकांत चव्हाण, शारदा बोरचाटे यांनी केली आहे.
--------------
पथदिवेही बंद
गावातील पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत गावातील पथदिवे बंद असल्याने अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका अधिक वाढला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन गावातील पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.