अकोला : महापालिकेच्या पाण्याचा फुकटात वापर करणार्या १0३ अवैध नळ कनेक्शनधारकांना दंडापोटी तब्बल ६ लाख ६५ हजार रुपये जमा करण्याची नोटीस प्रशासनाने शनिवारी बजावली. या नोटीसमुळे पाणी चोरी करणार्यांमध्ये घबराट पसरली असून, दंडाची रक्कम जमा न केल्यास फौजदारी दाखल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.मनपामार्फत नळ जोडणी न करता, खासगी कंत्राटदारांमार्फत अवैध नळ जोडणी करणार्यांची आता खैर नाही. नगरसेवकांना हाताशी धरून नळ जोडणी केल्यानंतर मनपाकडे अधिकृत नोंदणी न करणार्या नळधारकांचा शोध घेतला जात आहे. अर्थातच, पाणीपट्टी जमा न करता मनपाच्या पाण्याची चोरी करणार्या १0३ अवैध नळ कनेक्शनधारकांचा शोध घेऊन त्यांना दंडापोटी ६ लाख ६५ हजार रुपये जमा करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली. यामध्ये पूर्व झोनमधील १५, पश्चिम झोन-२३, उत्तर झोन-१५ व दक्षिण झोनमधील ५0 जणांचा समावेश आहे.
पाणी चोरी आली अंगलट
By admin | Published: September 21, 2014 1:43 AM