-संजय उमक मूर्तिजापूर : गत वर्षापासुन सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोना महामारीच्या या जैवीक युद्धात कीती तरी लोकांना आपलं जीवन संपवावं लागलय. या पार्श्वभुमीवर कोरोना संसर्गाला थांबवता यावं या हेतुने लॉकडाऊनचा प्रयोग केला जातोय. याचा कृषी क्षेत्रावर दुरगामी परीणाम झाल्याचं सत्य असुन तालुक्यात इतर शेती व्यवसाया सोबतच टरबूज या हंगामी शेतीला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यात लॉकडाऊनमुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना विदारक परिस्थीतीला सामोरे जावे लागले. तालुक्यातील धोत्रा शिंदे या गावातील शेतकरी दरवर्षी शेतात विविध प्रयोग करून काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. इथल्या काही शेतकर्यांनी वेगवेळ्या तब्बल ८ एकर क्षेत्रावर यावर्षी टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय. पिकांची संगोपणा करत ९ लाख रुपये खर्चही केला. मात्र ऐनवेळी लागलेल्या लॉकडाउनमुळे उत्पादीत झालेल्या मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळाली नसल्याने लागवडीसाठी लागलेला लाखो रुपयाचा खर्च व्यर्थ गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी टरबूज शेतीतून बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो. परंतु यावर्षी विक्री न झाल्याने संपूर्ण शेतीलील टरबूजाचे पिकच वाया गेले आहे. परिणामी शेतीला लागलेला खर्च सुद्धा निघाला नसल्यामुळे खरीपाची पेरणीपूर्व मशागत व पेरणी कशी करावी हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. झालेल्या नुकसानी बाबत शासनाकडून मतदीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मी थेट टरबूज व खरबूज रोपे मागवून त्याची ४ एकर शेतीत लागवड केली त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला, परंतु लॉकडाऊन मुळे बाजारात टरबूज व खरबूज या फळांना मागणी नसल्याने प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.-शिरीष देशमुखटरबूज उत्पादक शेतकरी, सिरसो लॉकडाऊन असल्याने व्यापारी माल घ्यायला तयार नाही, टरबूज शेतीतून उत्पादन झाले असले तरी तो लॉकडाऊनमुळे कुठेच विकता आला नाही, यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे, शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.-शेख समीरटरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे मार्च मध्ये दोन एकर मध्ये टरबूज लागलड केली होती त्यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे व्यापारी माल घेत नसल्याने व बाजारपेठ बंद असल्याने संपूर्ण माल वाया गेला.
-शराफत अली टरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे