अकोला : अकोला मंडळात महावितरणच्या प्रत्येक शाखा कार्यालयात वीज बिल समजाऊन सांगण्यासाठी ग्राहक समाधान मेळाव्यात जे ग्राहक सहभागी होऊ शकले नाही. त्यांच्यासाठी मंगळवार, ७ जुलै रोजी खास वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये ग्राहकांना वीजबिल समजाऊन सांगण्यात येणार आहे तथा त्यांच्या वीजबिलांविषयी तक्रारीचे निरसनही करण्यात येणार आहे. त्यामुळे अकोला मंडळातील वीज ग्राहकांनी या वेबिनार संवादात सहभाग नोंदवावा असे आवाहन अकोला मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.ग्राहकांना जुन महिन्यात आलेले वीज बिल हे मागील एप्रिल, मे व जुन महिन्याचे आले आहे. त्यामुळे वीज बिल वाढून आल्याचे दिसते. पण केवळ वीजबिल जास्त आले म्हणजे ते चूकीचे नसते, वीज बिल देतांना ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देण्यात आला आहे. शिवाय त्यांना एका पैशाचाही भूर्दंड पडणार नाही याची काळजी घेतली आहे. ग्राहकांचे वीजबिल अचूक असून ते ग्राहकांना समजाऊन सांगण्यासाठीच या बेविनारचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर चूकीच्या वीजबिलाचे निरसनही यावेळी करण्यात येणार आहे.वीज ग्राहक हा कायम महावितरणच्या केंद्रस्थानी राहीला आहे. वीज ग्राहकांच्या समाधानासाठी महावितरण कटीबध्द आहे. त्यामुळे अकोला मंडळातील सर्व उपविभाग, विभाग आणि मंडळ कार्यालयात ग्राहक समाधानासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात आले असल्याने ग्राहकांनी समाजमाध्यमात फिरत असलेल्या अफवेवर विश्वास न ठेवत या हेल्प डेस्कसी संपर्क करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान असणाऱ्या या वेबिनार मध्ये वीज ग्राहकांना http://bit.do/AKLWEB या लिंकव्दारे सहभागी होता येणार आहे. ग्राहकांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी या वेबिनार संवादात तांत्रिक, वित्त व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.या वेबिनार मध्ये सहभागी होण्यापुर्वी वीज ग्राहकांनी आपल्या वीजबिलाची https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन पडताळणी करावी. खरोखरच वीजबिल चूकीचे असल्यास त्या वीजबिलाची दुरूस्ती करण्यात येणार आहे.- पवनकुमार कछोट, अधिक्षक अभियंता,महावितरण, अकोला.
‘वेबिनार’मधून होणार वीज ग्राहकांच्या समस्यांचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:26 PM