अकोला : यावर्षी सतत तुरळक पाऊस सुरू असल्याने पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढतच असून, तणही वाढल्याने शेतकऱ्यांना वेगवेगळी कीड, तणनाशकासह जहाल व बंदी असलेल्या ‘मोनोक्रोटोफॉस’ची फवारणी करावी लागत आहे. परिणामी, खर्च चौपट वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.विदर्भात यावर्षी दमदार पाऊस नसला तरी पिकांना पोषक पाऊस होत आहे. परिणामी, सध्याची पीक परिस्थिती उत्तम आहे. तथापि, तुरळक स्वरू पाचा पाऊस सतत सुरू असल्याने तण वाढले असून, अनेक प्रकारच्या किडींना हा पाऊस पोषक ठरत आहे. सोयाबीनवर सध्या पाच प्रकारच्या, जातीच्या अळी, किडींनी आक्र मण केले आहे. कापूस, सोयाबीनवर रस शोषण करणाºया किडींचाही प्रादुर्भाव वाढत आहे. यावर महागडी कीटकनाशके फवारणी करण्यापेक्षा मोनोक्रोटोफॉसची फवारणी करण्यात येत आहे. या कीटकनाशकांचा वापर शेतकरी पिकावर टॉनिक म्हणूनही करीत आहेत. इतर कीटकनाशकांच्या किमतीपेक्षा मोनोक्रोटोफॉस प्रतिलीटर ३५० ते ३८० रुपये स्वस्त असल्याने याचा शेतकरी सर्रास वापर करीत आहेत. विषबाधांचे प्रकार घडल्यांनतर शासनाने मागच्यावर्षी मोनोक्रोटोफॉसवर बंदी घातली होती; परंतु मागणी बघता त्यावेळी भरपूर साठा उपलब्ध करण्यात आला होता. म्हणूनच आजही मोनोक्रोटोफॉस शेतकऱ्यांना मिळत आहे. हेच कीटकनाशक फवारणी केल्याने शेतमजूर, शेतकºयांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.सोयाबीन व कपाशीच्या शेतातील तण नष्ट करण्यासाठी एक लीटर तणनाशकांची किंमत ८०० ते १४०० रुपये आहे. यात एक ते दीड एकर फवारणी करता येते. कीड, अळ्यांचे व्यवस्थापन करायचे असल्यास किडीचा प्रकार पाहून औषध फवारणी करावी लागते. सोयाबीनवर आजमितीस पाच जातीच्या वेगवेगळ्या अळ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी ३०० मि.ली.चे औषध ३ हजार ८०० रुपयांच्यावर आहे. काही औषध ३,७०० रुपयांना अर्धा लीटर मिळतात. पण पीक येण्यासाठी शेतकºयांना उसनवारी, कर्ज काढून फवारणी करावी लागत आहे.
प्रतिकूल वातावरणामुळे कीड, अळ्यांच्या प्रादुर्भावासह तणही वाढले आहे. त्यामुळे शेतकºयांचा प्रचंड खर्च वाढला आहे.- मनोज तायडे,शेतकरी नेते,अकोला.