लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वीज निर्मिती केंद्रांना कोळसा आणि पाणी पुरेसे मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात तात्पुरत्या स्वरूपाचे आणखी दोन दिवस भारनियमन राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगि तले. जर ते शक्य झाले तर भारनियमन तातडीने बंद होऊ शकेल. विजेची जास्त हानी असलेल्या ई, एफ आणि जी गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार भारनियमन केले जात आहे. वीज निर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे ७ हजार मे.वॉ. आणि मे. अदानीकडून ३,0८५ मे.वॉ. वीज मिळणे अपेक्षित आहे; मात्र कोळशाची उपलब्धता व पाणीपुरवठय़ात आलेल्या अडचणींमुळे महानिर्मितीकडून सुमारे ४,५00 मे.वॉ. तसेच मे. अदानी कंपनीकडून १,७00 ते २,000 मे.वॉ. इतकीच वीज मिळत आहे. मे. एम्को व सिपतकडूनही २00 मे.वॉ. आणि ७६0 मे.वॉ. मिळण्याऐवजी अनुक्रमे १00 आणि ५६0 मे.वॉ. इतकीच वीज मिळत आहे. पॉवर ए क्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
आणखी दोन दिवस राहू शकते भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 8:29 PM
वीज निर्मिती केंद्रांना कोळसा आणि पाणी पुरेसे मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात तात्पुरत्या स्वरूपाचे आणखी दोन दिवस भारनियमन राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगि तले. जर ते शक्य झाले तर भारनियमन तातडीने बंद होऊ शकेल.
ठळक मुद्देवीज निर्मिती केंद्रांना कोळसा आणि पाणी पुरेसे मिळत नसल्याने अनेक अडचणीपॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावर सुरू