अकोला : उन्हाळी सुट्टय़ानंतर सोमवारी शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार असून, मुलांच्या स्वागतासाठी फुलांसह शाळा प्रशासन व लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार असल्याने शाळेचा पहिला दिवस हा आनंदी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे. जिल्ह्यातील एकूण ९२४ शाळेतील पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी शासनाने प्रवेशोत्सव संकल्पना अस्तित्वात आणली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी २७ जून रोजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, तर दुपारच्या जेवणात मुलांना गोडधोड खाऊ घालण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही खासगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच उर्वरित खासगी संस्थेच्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.
फुलांनी होणार मुलांचे स्वागत
By admin | Published: June 27, 2016 2:40 AM