अकोला : येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने ह्यशारीरिक शिक्षणातील आधुनिक प्रवाहह्ण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन, अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.व्ही.एम. शर्मा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू होते. यावेळी मंचावर अमरावती विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मारकेश लकडे, नागपूर येथील प्राचार्य डॉ. यशवंत पाटील, इंदूर येथील देवी अहिल्या विद्यापीठाचे डॉ. सुनील दुधाळे, समन्वयक प्रा. चंद्रशेखर कडू, प्रा. अविनाश थोटे आदी उपस्थित होते. चर्चासत्राच्या पहिल्या भागात डॉ. मीना ठुसे अमरावती व डॉ. सुवर्णा भालेराव यांच्या उपस्थितीत ५ संशोधकांनी आपले निबंध वाचले. दुसर्या सत्रात डॉ. ए.डी. गडकरी, नागपूर व डॉ.व्ही.एन. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संशोधकांनी निबंध वाचन केले. चर्चासत्राचा समारोप प्राचार्य डॉ. जगदीश साबू यांच्या अध्यक्षतेखाली झाला. चर्चासत्रात देशभरातील १५0 च्या वर संशोधक सहभागी झाले होते. संचालन प्रा. डिंपल मापारी यांनी मानले.
पारंपरिक मूल्याबरोबर नव्याचेही स्वागत करा
By admin | Published: December 16, 2014 1:00 AM