पंढरपूर निवासी संस्थेच्या धर्मशाळेत विविध कार्यक्रम पार पडले. आषाढी वारी पूर्ण करून परतलेल्या वारकऱ्यांचा श्रद्धासागर येथे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले होते. याप्रसंगी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे, ज्ञानेश प्रसाद पाटील उपस्थित होते. दरम्यान, गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या निवासस्थानी पादुकांचे पूजन व आरती हभप माधवराव मोहोकार, पुरुषोत्तम मोहोकार यांनी केले. संत वासुदेव नगर, नरसिंग मंदिर, यात्रा चौक, नंदीपेठ मार्गावर दिंडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव रवी वानखडे, सहसचिव मोहन जायले पाटील, अवी गावंडे, विश्वस्त सदाशिवराव पोटे, अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, कानुसेठ राठी तथा नगरसेवक मंगेश चिखले, संदेश रोडे, प्रा. साहेबराव मंगळे, डॉ. सुहास कुलट, अतुल कोरपे, सुधाकरराव हिंगणकर, प्रदीप हिंगणकर यांची उपस्थिती होती.
---------------------
पायदळ दिंडी वारीत यांचा समावेश
पंढरपूर पायदळ दिंडीत सहभागी अंबादास महाराज, महादेवराव ठाकरे, श्रीराम कोरडे, उमेश मोहोकार, किसनराव जोध, श्रीकृष्ण काळे, नागोराव बायस्कार, प्रभाकरराव डोबाळे, बाळकृष्ण वाकोडे, साहेबराव वाघ, विपुल मोहोकार, भास्करराव म्हसाये, महादेवराव बिहाडे, विलास गीते, मदन मोहोकार आदी वारकऱ्यांचे संस्थाध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले यांनी स्वागत केले.