दिग्रस खुर्द येथील रहिवासी, सीएनजी कमांडो सैनिक असलेले सुदर्शन दादाराव इंगळे हे सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यांना मुलगी झाल्याचे कळताच ते घरी परतले. त्यांनी मुलीचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने गावातून फेरी काढून फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले.
शासनाकडून गरोदर मातांचे संगोपन, मुलींचे स्वागत करणे, मुलापेक्षा मुलगी बरी, भ्रूणहत्या, मुलगीसुद्धा वंशाचा दिवा आहे, याबाबत समाजात जनजागृती व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. कन्यारत्न झाल्याने दिग्रस खुर्द येथील कुटुंब सुदर्शन दादाराव इंगळे व त्यांची पत्नी प्रणिता, आई मंगलाताई, वडील दादाराव इंगळे यांनी गावात येऊन आनंद बुद्धविहारावर वंदन केले. गावातून महिलावर्गाकडून या मुलीचे फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. फीत कापून गृहप्रवेश केला.