लाभार्थ्यांच्या यादीचे पितळ उघडे
घरी शौचालय असतानाही नागरिकांना विश्वासात घेण्याची जबाबदारी काही आरोग्य निरीक्षकांनी घेतली होती. या बदल्यात एक-दोन नव्हे तर तब्बल साडेचारशे लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी काही आरोग्य निरीक्षकांची वेतनकपात, तर काहींना थेट सेवेतून बडतर्फ केले होते, हे येथे उल्लेखनीय. अशा विविध गंभीर बाबींकडे महापालिकेच्या प्रशासनाने जाणीवर्पूक दुर्लक्ष केल्याचा आराेप नगरसेवक पराग कांबळे यांनी केला आहे.
दाेन वर्षांपासून कारवाई का नाही?
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शाैचालय घाेळाच्या चाैकशीचा आदेश दिला हाेता. त्यानंतर महापालिकेची सूत्रे स्वीकारणारे आयुक्त संजय कापडणीस यांनी स्वत: नव्याने चाैकशी करण्याचा आदेश दिला. मागील दाेन वर्षांच्या कालावधीत तत्कालीन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांनी चाैकशी पूर्ण केली नाही का, आणि केली असेल तर काय कारवाई केली, याची माहिती देण्याची मागणी नगरसेवक पराग कांबळे यांनी केली आहे.