शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

चारचाकीची तपासणी, दुचाकीचे काय?

By admin | Published: October 13, 2014 1:28 AM

विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सध्या ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू.

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सध्या ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. अवैध वस्तू किंवा रक्कम पकडल्या जावी यासाठी वाहनांची कसून तपासणी शहराच्या चहूबाजूने सुरू आहे; परंतु चारचाकी वाहनांची तपासणी होत असताना दुचाकीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. दुचाकीतूनही अवैध वस्तू किंवा रकमेची वाहतूक होऊ शकते याचे भानच तपासणी करणार्‍यांना नसल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात अवैध रकमेची उलाढाल होते. आतापर्यंत करोडो रुपयांची रक्कम राज्यातील विविध शहरांच्या सीमेवर पकडल्या गेली. अकोला शहरातदेखील अवैध वस्तू किंवा रक्कम येऊ नये यासाठी रस्त्याच्या चहूबाजूंनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. अकोल्यात मंगरुळपीर रस्त्यावर खडकीजवळ, पातूर रस्त्यावर हिंगणा फाटा येथे, बाळापूर रस्त्यावर टी-पॉईंटवर, मूर्तिजापूर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर, आकोट रस्त्यावर शासकीय गोडाऊन जवळ, आपातापा रस्त्यावर रेल्वे क्वार्टरच्या मागील बाजूस तसेच डाबकी रोड, येवता रोड, गुडधी रोडवर ठिकठिकाणी चेक पोस्ट नाके तयार करून तिथे गाड्यांची तपासणी केली जात आहे. चेक पोस्ट नाक्यावर इंडो-तिबेट तसेच नागालँन्डचे हत्यारबंद पोलिस कसून चारचाकी वाहनांची तपासणी करीत आहेत. महाराष्ट्र पोलिसदेखील त्यांच्या सोबतीला आहेत. या शिवाय निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील आहेत. हे सर्व चारचाकी वाहन थांबवून डिक्की उघडून व चालकाची चौकशी करून तपासणी करीत आहेत; परंतु या तपासणीतून दुचाकी वाहनांना वगळण्यात आले आहे. ज्याप्रमाणे चारचाकीतून अवैध वस्तू व रकमेची वाहतूक होऊ शकते त्याप्रमाणे दुचाकीतूनदेखील अवैध वस्तू व रकमेची वाहतूक होऊ शकते याकडे हे कर्मचारी साफ दुर्लक्ष करीत आहेत. नेमके हेच भारी पडू शकते, याची कोणालाही शंका नाही.