सचिन शिंदे
हुंडा मागणे ही प्रथा असली तरी नवीन पिढीतील उपवर युवक व युवती या विराेधात असल्याचे दिसून येते़ हुंड्याचा काळ आता मागे पडला आहे़ त्याकडे नवीन पिढी दुर्लक्ष करीत असल्याचे सत्य आहे़
रुपेश पाठक
मुलांच्या पालकांना काय वाटते?
हुंडा ही जुनी प्रथा आहे़ मुलीसाठी लग्नात येणारा खर्च हा मुलीचे वडील मुलाच्या वडिलांकडे राेख स्वरुपात द्यायचे़ तेव्हापासून याला हुंडा म्हटले जाते़ कालांतराने याला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले़ त्यामुळे यातून वाद हाेऊन पाेलिसांपर्यंत प्रकरणे गेली़ त्यामुळे आता हुंड्याला माझा विराेध आहे़
एक पालक
हुंडा हा लग्नातील खर्चाचा विषय हाेता़ आता याच रकमेतून मुलाचा व्यवसाय मुलाला नाेकरी लावून देण्यासाठी आमिष काही मुलींच्याच वडिलांनी दिले़ त्यामुळे याचे विद्रुपीकरण झाले आणि याच कारणावरुन संसार तुटू लागले़
हा प्रकार आता कमी हाेत असल्याचेही दिसून येत आहे़
एक पालक
मुलींच्या मनात काय?
आजच्या पिढीतील मुली मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. बऱ्याच क्षेत्रात मुलांपेक्षाही पुढे गेल्या आहेत़ त्यामुळे जुनी चालीरीत असलेल्या हुंड्यासारखे प्रकार आता बंद झाल्याचे दिसून येते़ ‘हुंडा हा प्रकार आता नवीन पिढी लक्षात ठेवत नाही़
श्वेता भगत
हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे़ मात्र आपल्या देशात यातून अनेक पळवाटा काढण्यात आल्या. दागदागिने घेणे, कापड घेणे, यासारखा खर्च मुलींच्या वडिलांकडून घेतला जाताे़ हाच प्रकार हुंडा असल्याचेही वास्तव आहे़
रक्षा पागृत
मुलींच्या पालकांना काय वाटते?
हुंडा कायद्याने बंद केला असला तरी वरपक्षाची अपेक्षा ही नेहमी असतेच़ मध्यस्त असलेल्या व्यक्तीकडे मुलगा माेठ्या नाेकरीवर आहे़ शिक्षणासाठी खर्च आलेला आहे़ त्यामूळे पुढे घर घेणे किंवा इतर सुविधांसाठी मुलीच्या पालकांकडे अपेक्षा ठेवण्यात येतात़ नाईलाजाने हुंडा म्हणून रक्कम द्यावी लागते़
एक पालक
समाजाने हुंड्याची रीत पाडलेली आहे़ हुंडा देणे व घेणे गुन्हा असला तरी या कायद्याला आपलाच समाज पायदळी तुडविताे़ मुलीच्या सुखासाठी तिचे वडील काहीही तडजाेड करतात व वरपक्षाची मागणी पूर्ण करतात़ हा प्रकार सातत्याने सुरू आहे़ पुढेही सुरू राहणार असे दिसते़ मात्र पूर्वीपेक्षा आता हा प्रकार कमी झाला आहे़
एक पालक