शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर
2
Today Daily Horoscope: २८ जून २०२४: कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल, मनातील चिंतेचे ढग दूर होतील!
3
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला; ७ लाख कोटींच्या वर गेला आकडा   
4
BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर
5
विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी
6
लोकल प्रवाशांची साद! 'कल्याण'चं काहीतरी कर रे रामराया...
7
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! कोणतीच परीक्षा 'नीट' नाही
8
पाहुण्या दक्षिण आफ्रकेची 'कसोटी'! आजपासून INDW vs SAW एकमेव सामन्याचा थरार
9
घोटाळा ‘क्वांट’चा; फटका ‘क्वांटम’ला; ‘तो मी नव्हेच’ असे म्हणायची कंपनीवर वेळ
10
India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले 
11
आजचा अग्रलेख : नेमेचि होतो घोळ!
12
डेंग्यूचा डंख! वर्षभरात राज्यात ५५ जणांचा मृत्यू; आर्थिक पाहणीत आरोग्याची स्थिती उघड
13
जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव 
14
देशात एकच प्रत्यक्ष, तीही जुनी करप्रणाली आवश्यक 
15
“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले
16
पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार? भाजपाकडून चाचपणी सुरू, ११ जणांची नावे चर्चेत
17
मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक
18
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले... 
19
“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार
20
जिओच्या ग्राहकांवर संक्रांत! मोठी दरवाढ, अनलिमिटेड 5G साठी २३९ नाही, ३४९ रुपये मोजावे लागणार

मतदान केंद्रावर राहणार व्हीलचेअर;  व्हीलचेअर खरेदीत कमिशनखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 2:01 PM

मतदान केंद्रावर अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर ठेवण्याचा आदेश निवडणूक विभागाने दिल्यानंतर जिल्ह्यात व्हीलचेअर खरेदीसाठी लगबग सुरू आहे; मात्र व्हीलचेअर खरेदीसाठी संबंधित आस्थापनेला एकाच दुकानातून घेण्याचा आग्रह करीत असल्याने यामध्ये मोठा घोळ सुरू आहे.

- सचिन राऊतअकोला : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर ठेवण्याचा आदेश निवडणूक विभागाने दिल्यानंतर जिल्ह्यात व्हीलचेअर खरेदीसाठी लगबग सुरू आहे; मात्र व्हीलचेअर खरेदीसाठी संबंधित आस्थापनेला एकाच दुकानातून घेण्याचा आग्रह करीत असल्याने यामध्ये मोठा घोळ सुरू आहे. विशेष म्हणजे, सदर दुकानातून दुप्पट रक्कम देऊन व्हीलचेअर खरेदी करण्यात येत असल्याने यामध्ये मोठी कमिशनखोरी सुरू असल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशभरात विविध टप्प्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असून, त्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांसाठी काही सुविधा बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांगांसाठी व्हीलचेअर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित आस्थापना म्हणजेच मनपाच्या अखत्यारीत असलेल्या शाळा मतदान केंद्र असेल, तर त्या व्हीलचेअर संबंधित शाळा प्रशासन व मनपाने खरेदी कराव्या. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी संस्थांच्या शाळा मतदान केंद्र असेल तर त्यांनीही त्यांच्या आस्थापनेच्या खर्चातून व्हीलचेअर खरेदी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर व्हीलचेअर खरेदीसाठी सध्या धावपळ सुरू असून, मनपा, न.पा., जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शाळांमध्ये व्हीलचेअर खरेदीसाठी मोठा घोळ घालण्यात आला आहे. संबंधित शाळा स्तरावरील अधिकारी व्हीलचेअर खरेदीसाठी गेल्यानंतर अकोल्यातील पंचायत समितीसमोरील भागातच असलेल्या एका सोसायटी परिसरातील एकाच दुकानातून व्हीलचेअर खरेदी करण्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. या दुकानात दुप्पट किमतीत व्हीलेचअर विक्री सुरू असतानाही याच ठिकाणावरून व्हीलेचअर खरेदी करण्यासाठी जबरदस्तीच करण्यात येत असल्याने यामध्ये मोठी कमिशनखोरी सुरू असल्याचीही माहिती आहे.६०० व्हीलचेअरसाठी भागीदारीजिल्हा परिषद व सातही पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी एका दुकानदारासोबत व्हीलचेअर खरेदी-विक्रीसाठी भागीदारीच केल्याची चर्चा आहे. संबंधित दुकानदारानेही तब्बल ६०० व्हीलचेअर खरेदी केल्या असून, पंचायत समितीचे अधिकारी संबंधित शाळा प्रशासनाला याच दुकानातून दुप्पट किमतीत व्हीलचेअर खरेदी करण्यासाठी आग्रह धरीत आहेत. त्यामूळे आतापर्यंत ३०० वर व्हीलचेअरची विक्री भागीदारीतच करण्यात आल्याचे वास्तव असून, शासनाला आर्थिक भुर्दंड लावण्यात येत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला