गंभीर रुग्ण नाहीत; पण बेफिकरी येऊ शकते अंगलट
कोविडच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक गंभीर रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाट मिळणेही कठीण झाले होते. मात्र, सद्य:स्थितीत परिस्थिती सुधारली असून, गंभीर रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. कोविडला हरवण्यासाठी ही स्थिती चांगली असली, तरी अकोलेकरांची बेफिकरी अंगलट येऊ शकते.
अशी आहे जीएमसीची स्थिती
संदिग्ध रुग्ण - ७
आयसीयूमध्ये - ४
पॉझिटिव्ह - ०
ऑक्सिजनची गरजही कमी
सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयूमध्ये केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे दिवसाला केवळ ८६.४ क्युबिक मीटर येवढ्याच ऑक्सिजनची गरज भागत आहे. कोविडचे गंभीर रुग्ण नसल्याने ऑक्सिजनची मागणीदेखील घटली आहे.
ॲक्टिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
सर्वोपचार रुग्णालयात एकही गंभीर रुग्ण दाखल नसला, तरी गत आठवडाभरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा २० वर पोहोचली होती. मागील आठवड्यात हीच संख्या ११ पर्यंत कमी झाली होती. हळूहळू वाढणाऱ्या ॲक्टिव्ह रुग्णांमुळे अकोलेकरांची चिंता वाढली आहे.