अकोला : देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असताना दिवसातील १८ तास सातत्याने कामात व्यस्थ असणारे पंतप्रधान सर्वसामान्य अकोलेकराची दखल घेतात, तेव्हा त्यांच्यातील जिव्हाळ्य़ाचे संबंध जोपासणार्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार चालविताना सर्वसामान्यांच्या सूचनांचा नेहमीच आदर केला आहे. सोशल मीडियाचा त्यासाठी त्यांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला आहे. ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न पोहोचतात, तेव्हा त्याची तेवढय़ाच आत्मीयतेने ते दखलही घेतात. याचाच प्रयत्न अकोल्यातील गोरक्षण रोडवर राहणारे तसेच आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक महाबीजमधील सेवानवृत्त अधिकारी श्रीराम देशमुख यांना आला. सतत ट्विटरच्या माध्यमातून श्रीराम देशमुख यांनी वेगवेगळ्या सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्याची दखलही त्यांनी वेळोवेळी घेतली आहे. देश कारभारात सर्वसामान्यांकडून मिळणार्या सूचना वाचून विसरून न जाता, या सूचनांचा तर त्यांनी आदर केलाच आहे, पण सूचना करणार्यांनाही ते कधी विसरले नाहीत. हाच प्रत्यय ११ एप्रिल रोजी देशमुख परिवाराला आला. श्रीराम देशमुख यांचा ११ एप्रिल रोजी वाढदिवस होता. त्यांना सकाळी ६ वाजता पंतप्रधानांनी ट्विटरवरून पंतप्रधानांनी शुभेच्छा देऊन देशमुख परिवाराला सुखद धक्का दिला. पंतप्रधानांनी दाखविलेली आपुलकी त्यांच्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याचा परिचर देऊन गेली.
सर्वसामान्य अकोलेकराची पंतप्रधान दखल घेतात तेव्हा..
By admin | Published: April 12, 2016 1:51 AM