अकोला : शेती कामासाठी शेतमजूर मिळत नसल्याने शासनाने यांत्रिकीकरणावर भर दिला असून, ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे अर्जही शेतकºयांकडून मागविले; पण कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र प्राप्त झाले नसल्याने राज्यातील हजारो शेतकºयांना या पत्राची प्रतीक्षा आहे.ट्रॅक्टरवर अनुदान देण्यासाठीची ही योजना शासनाने सुरू केलेली असून, या योजनेत सुरुवातीला दोन ते पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले. सोडतद्वारे ट्रॅक्टरचे अनुदान मिळणार असल्याने राज्यातील हजारो शेतकºयांनी यासाठी अर्ज भरले; परंतु या अनुदानासंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतेच दिशानिर्देश प्राप्त झाले नाहीत. अशा अवस्थेत शेतकरी संभ्रमात सापडला असताना २ नोव्हेंबर रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयात उच्चस्तरीय अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आता एक ते १ लाख २५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला आहे. यात अल्पभूधारक शेतकºयांना १ लाख २५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.दरम्यान, अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोनशे पन्नासच्यावर शेतकºयांनी अर्ज भरलेले आहेत. त्यासाठीची सोडत मागील मे, जून महिन्यात काढण्यात आली. यामध्ये ज्या शेतकºयांची नावे आली, त्या शेतकºयांना अनुदानासाठी कृषी विभागाच्या पूर्वसंमतीची गरज आहे; परंतु कृषी विभागाने अद्याप संमती पत्र न दिल्याने शेतकºयांना ट्रॅक्टर खरेदी करणे अवघड झाले आहे. अनुदान मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी द्विधा मन:स्थितीत असून, त्याचे प्रतिकूल परिणाम मात्र ट्रॅक्टर खरेदीवर झाले आहेत.
ट्रॅक्टर अनुदानात बदल करण्यात आला असून, आता दोन ते पाच लाखऐवजी एक ते १ लाख २५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी अवजारे खरेदीसाठी मात्र शेतकºयांना शंभर टक्के अनुदान देण्यात येईल. नवीन दिशानिर्देश प्राप्त होताच निवड झालेल्या शेतकºयांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पूर्वसंमती पत्र देण्यात येईल.सुभाष नागरे,विभागीय कृषी सहसंचालक,अमरावती.